भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं दिर्घ आजाराने निधन

by team

---Advertisement---

 

वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातून भाजप चे आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन झालं आहे. ५९ वर्षीय राजेंद्र पाटणी हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून आजारी होते. मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मुंबई येथे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने राजेंद्र पाटणी यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या दोनही किडण्या फेल झाल्या होत्या. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते आजाराने त्रस्त होते. पाटणी यांच्या निधनानंतर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट लिहून श्रध्दांजली अर्पण केली आहे.

राजेंद्र पाटणी हे १९९७ ते २००३ या काळात शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार होते. त्यानंतर २००४ (शिवसेनेकडून), तर २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपकडून असे तीन वेळा कारंजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट
“अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ॐ शांती”

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---