---Advertisement---

भाजप खासदाराच्या गाडीचा भीषण अपघात, सुदैवाने खासदार सुखरुप, पण…

---Advertisement---

भाजप खासदार अशोक नेते यांच्या गाडीचा मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आलीय. नागपूरहून गडचिरोलीकडे जात असताना वीरगाव गावाजवळ हा अपघात झालाय. सुदैवाने या भीषण अपघातातून अशोक नेते हे थोडक्यात बचावले आहेत. ते सुखरुप आहेत. पण गाडीचं प्रचंड नुकसान झालंय.

गडचिरोलीच्या दिशेला जात असताना समोरुन येणाऱ्या गाडीने त्यांच्या फॉर्ड गाडीला धडक दिली. गाडीच्या उजव्या बाजूलाही धडक बसली. यामध्ये गाडीचं प्रचंड नुकसान झालंय. पण सुदैवाने या अपघातातून अशोक नेते हे थोडक्यात बचावले आहेत. ते सुखरुप असून आता गडचिरोलीला पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment