भाजप नेत्याचा उध्दव ठाकरेंनी फार्म हाऊसमध्ये नोटा लपविल्याचा आरोप

मुंबई : कर्जत येथील ठाकरे यांच्या फार्म हाऊसमध्ये दोन हजार रूपयांच्या नोटांची किती झाडे लावली आहेत ती झाडं मोजा त्यानंतर आमच्यावर टीका करा असे वक्तव्य भाजप नेते नितेश राणे यांनी केला ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नितेश राणे यांनी पुन्हा शिवसेना (ठाकरे गटाचे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यासोबत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप केले आहेत. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत पैसे घेतल्याशिवाय कोणालाही काहीही दिलं नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडून बीएमसी निवडणुकीत उमेदवारांना तिकीट देण्यासाठी दोन कोटींची मागणी होत आहे. त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेही तेच करतो आहे.

संजय राऊत यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्याने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा खिल्ली उडवत नितेश राणे यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमावलेल्या २००० च्या नोटांचे बंडल कर्जत फार्म हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.