नंदुरबार : येथील रहिवासी तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे सध्या उत्तर महाराष्ट्राचा संघटनात्मक दौरा करीत आहेत. याअंतर्गत संघटनात्मक बैठका घेणार आहेत. 26 रोजी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहतील. त्यानंतर 27 रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा प्रवास योजनेंतर्गत चोपडा विधानसभा, यावल- रावेर विधानसभा, भुसावळ विधानसभा पदाधिकाऱ्यांची विजय चौधरी कार्यशाळा घेणार आहेत. 28 रोजी मुक्ताईनगर विधानसभा, जामनेर विधानसभा पदाधिकारी बैठकीस मार्गदर्शन करतील. 29 रोजी नाशिक येथे जनजाती सुरक्षा मंच आयोजित आदिवासी समाजाच्या रॅलीत सहभागी होणार आहेत. 30 रोजी धुळे शहर व ग्रामीण विधानसभा तसेच शिंदखेडा विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस मार्गदर्शन करतील. त्यानंतर 31 रोजी साक्री विधानसभा पदाधिकारी कार्यशाळेत मार्गदर्शन करतील.