भारतात पॅरासिटामॉलसह १५६ धोकादायक औषधांवर बंदी

ताप, सर्दी, ऍलर्जी आणि वेदनांसाठी वापरल्या जाणाऱ्या १५६ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांवर सरकारने बंदी घातली आहे. आता ही औषधे बाजारात विकली जाणार नाहीत. ही औषधे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, असे सरकारने म्हटले आहे.

एफडीसी ही अशी औषधे आहेत, जी दोन किंवा अधिक औषधे निश्चित प्रमाणात मिसळून तयार केली जातात. सध्या अशा औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यांना कॉकटेल औषधेदेखील म्हणतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १२ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ॲसेक्लोफेनॅक ५० एमजी+ पॅरासिटामॉल १२५ एमजी टॅब्लेटवर औषधे म्हणून वापरण्यास बंदी घातली आहे.

बंदी घातलेल्या एफडीसीमध्ये मेफेनॅमिकॲसिड पॅरासिटामोल इंजेक्शन, सेटीरिझिन एचसीएल पॅरासिटामोल+ फेनिलेफ्रीन एचसीएल, लेव्होसेटिरिझिन+ फेनिलेफ्रिन एचसीएल पॅरासिटामोल, पॅरासिटामोल+ क्लोरफेनिरामाईन मॅलेट फेनिल प्रोपेनोलामाईन आणि कॅमिलोफिन डायहाइड्रोक्लोराईड २५एमजी ३ यांचा समावेश आहे.

पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टारिन आणि कॅफिनच्या मिश्रणावरही सरकारने बंदी घातली आहे. ट्रामाडोल हे वेदना कमी करणारे औषध आहे. अधिसूचनेनुसार, आरोग्य मंत्रालयाला असे आढळून आले की, एफडीसी औषधांचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. सुरक्षित पर्याय उपलब्ध असताना. केंद्राने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती

एफडीसी धोकादायक
औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने (डीटीएबी) देखील या एफडीसीचे परीक्षण करून शिफारस केली की, या एफडीसीचा कोणताही उपयोग नाही. उलट, एफडीसी औषधांकडून धोका असू शकतो. त्यामुळे सार्वजनिक हितासाठी या एफडीसीचे उत्पादन, विक्री किंवा वितरण यावर बंदी घालणे आवश्यक आहे. या यादीत अशा काही औषधांचा समावेश आहे, ज्या आधीच अनेक औषध उत्पादकांनी बंद केल्या आहेत. गेल्या वर्षी जूनमध्येही १४ एफडीसींवर बंदी घालण्यात आली होती. सरकारने २०१६ मध्ये ३४४ एफडीसीचे उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. या निर्णयाला औषध कंपन्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.