तरुण भारत लाईव्ह न्युज : मूळ जम्मूच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड हा ‘किताब जिंकून भारताची मान उंचावली आहे. या स्पर्धेत ६३ देशातील महिला सहभागी झाल्या होत्या. २१ वर्षांनी भारताला हा बहुमान मिळाला आहे. २००१ साली डॉ. अदिती गोवित्रीकरने हा किताब जिंकला होता. ३२ वर्षीय सरगम कौशल मूळ जम्मू-काश्मीरची आहे. सरगमने इंग्रजी साहित्यात पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. सरगम यांनी विशाखापट्टनम मध्ये शिक्षिका म्हणून काम केले आहे. २००८ साली तिचे लग्न झाले. तिचे पती इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत आहे.
मिसेस वर्ल्ड झाल्यानंतर सरगम कौशल यांनी एक विडिओ शेअर केला आहे. ‘मी खूप आनंदी आहे. ‘२१-२२ वर्षांनी आपल्याला हा मुकुट परत मिळाला आहे. मी खूप उत्साहित आहे लव्ह यु इंडिया, लव्ह वर्ल्ड.’
मिसेस वर्ल्ड या स्पर्धेचे आधीचे नाव मिसेस अमेरिका वरून ते बदलून ‘मिसेस वूमन ऑफ द वर्ल्ड’ करण्यात आले. १९८८ पासून या स्पर्धेला ‘मिसेस वर्ल्ड’ या नावाने ओळखले जाते. . गेल्या काही वर्षांपासून ८० देशातील महिला या देशात सहभागी होत आहेत.
२००१ मध्ये डॉ. अदिती गोवित्रीकर यांनी मिसेस वर्ल्डचा किताब पटकावला होता. . हे विजेतेपद पटकावणारी अदिती ही पहिली भारतीय महिला ठरली. त्यानंतर आता अदिती २०२२ च्या स्पर्धेत ज्युरी म्हणून सहभागी झाली होती.