नवी दिल्ली : भारतीयांना आता लवकरच ई-पासपोर्ट मिळणार आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पासपोर्ट सेवा दिवसानिमित्त लवकरच पासपोर्ट सेवा कार्यक्रम २.० सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर लोकांना एक चिप असलेला ई-पासपोर्ट मिळेल. अशी घोषणा भारतचे परराष्ट मंत्री यांनी केली.
परराष्ट्र मंत्री म्हणाले की, ”
पासपोर्ट सेवा लवकरच लोकांना विश्वासार्ह, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पासपोर्ट सुविधा प्रदान करेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्राचा वापर नवीन चिप्ससह प्रगत आणि अपग्रेडेड पासपोर्ट तयार करण्यासाठी देखील केला जाईल.
ई-पासपोर्ट कार्यक्रम २.० अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पासपोर्ट बनवले जातील. यामध्ये अद्ययावत बायोमेट्रिक्स तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे पासपोर्ट मिळवणे सोपे होणार असून युजरचा डेटाही सुरक्षित राहणार आहे. ई-पासपोर्टसाठी लागणारे सॉफ्टवेअर आयआयटी कानपूर आणि एनआयसीने विकसित केले आहे.