नवी दिल्ली : किरकोळ महागाईचा दर आता स्थिर आहे. जागतिक पातळीवर झालेली उलथापालथ आणि प्रतिकूल हवामानामुळे मागणी-पुरवठ्यातील समन्वय बिघडल्याने काही वेळा यात वाढ झाली. मात्र, ती अस्थायी स्वरूपाची होती, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी सोमवारी सांगितले. एप्रिल-ऑक्टोबर २०२२ या कालवाधीत ७.१ टक्क्यांवर असलेली किरकोळ महागाई २०२३ मधील समान कालावधीत ५.४ टक्क्यांवर आला, असे सीतारामन् यांनी लोकसभेत दिलेल्या एका लेखी उत्तरात म्हटले आहे.
किरकोळ महागाई आता स्थिर आहे आणि निर्धारित केलेल्या ६ टक्क्यांच्या तुलनेत ती २ टक्क्यांवर आहे.किरकोळ चनलवाढीतून अस्थिर अन्न आणि इंधनाच्या वस्तू काढून टाकल्यानंतर अंदाजित मूळ चलनवाढीत झालेली स्थिर घट, भारतीय अर्थव्यवस्थेतील महागाईचा दबाव कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे, असे सीतारामन् यांनी सांगितले.