भारतीय’ क्रिकेटर अत्याचार प्रकरणातून निर्दोष, ऑस्ट्रेलियन महिलेने केले होते आरोप

भारतीय वंशाचा क्रिकेटपटू निखिल चौधरी, जो ऑस्ट्रेलियात खेळतो आणि बिग बॅश लीग (BBL) मध्ये एक प्रसिद्ध नाव आहे. 28 वर्षीय निखिल चौधरीची अलीकडेच 2021 मध्ये टाऊन्सविले येथे 20 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. आता बातमी अशी आहे की तो बिग बॅश लीगच्या होबार्ट हरिकेन्समध्ये पुनरागमन करणार आहे. मात्र, एक नवीन समस्या समोर आली आहे.

नवीन समस्या काय आहे?
मार्चमध्ये, निखिल चौधरीला 2021 मध्ये टाऊन्सविलेमध्ये 20 वर्षीय महिलेवर कथित अत्याचारच्या प्रकरणात ज्युरींनी निर्दोष ठरवले होते. क्रिकेट तस्मानियाचे म्हणणे आहे की, या आरोपाबाबत किंवा न्यायालयीन प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली नाही.

क्रिकेट तस्मानिया निखिलवर नाराज आहे
क्रिकेट तस्मानियाचे हाय परफॉर्मन्स जनरल मॅनेजर सॅल्यान बीम्स यांनी मीडियाला सांगितले की फ्रँचायझी अजूनही निखिलच्या बाबतीत काही अंतर्गत प्रक्रिया पूर्ण करत आहे. आगामी मोसमात निखिल खेळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

निखिलने क्रिकेट तस्मानियाला आरोप किंवा न्यायालयीन कार्यवाहीबद्दल माहिती दिली नाही याबद्दल सॅल्यानने निराशा व्यक्त केली. ते म्हणाले की, संस्थेच्या दृष्टिकोनातून अशी माहिती देणे गरजेचे आहे कारण त्यामुळे संस्थेच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो.