जळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज जळगाव दौरा होता. जळगावातील सागर पार्क येथे त्यांनी युवा संवांद कार्यक्रमाद्वारे तरुणांशी संवाद साधला. या कार्यक्रमानंतर त्यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी ५ मार्च रोजी जळगाव शहरात सागर पार्क येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी तरुणांशी संवाद साधला. त्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मंत्री गिरीश महाजन यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते सायंकाळी ५ वाजता करण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्र शेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिताताई वाघ, खासदार रक्षा खडसे, खा. उन्मेषदादा पाटील, जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी आमदार चंदूभाई पटेल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते