शेअर बाजार: अमेरिकन बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावर झाला असून दिवसाच्या सुरुवातीच्या व्यापार सत्रात देशांतर्गत मार्केट दबावाखाली व्यवहार करत असताना सेन्सेक्स आणि निफ्टी १% घसरणीसह तर बँकिंग, आयटी आणि वित्तीय शेअरवर सर्वाधिक दबाव दिसून येत आहे. दिवसाच्या सुरुवातीला शेअर बाजार आज मोठ्या घसरणीने उघडला असून जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारांवर झालेला दिसून येत आहे.
भारतीय बाजारात निफ्टी २०० अंकांनी घसरला तर बीएसई सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरला आहे. सर्वच क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसत असताना याचा सर्वात जास्त परिणाम आयटी, बँकिंग, फायनान्शिअल, मिडकॅप आणि फार्मा क्षेत्रावर होताना दिसत आहे.