नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडचा 347 धावांनी पराभव करून महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. भारताच्या विजयाची हिरो ठरली दीप्ती शर्मा हिने या सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या. भारताला इंग्लंडला फॉलोऑन देण्याची संधी होती, पण संघाने तसे केले नाही.
यानंतर टीम इंडियाने आपला दुसरा डाव 6 गडी गमावून 188 धावांवर घोषित केला. तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला हा सामना जिंकून इतिहास रचायचा होता, पण इंग्लंडला तसे करता आले नाही.ग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर भारताचा हा पहिलाच कसोटी विजय आहे. भारतीय गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी शानदार कामगिरी करत पहिल्याच सत्रात इंग्लंडच्या संपूर्ण संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.भारताकडून दीप्ती शर्माने 4 आणि पूजा वस्त्राकरने दुसऱ्या डावात 3 बळी घेतले. महिलांच्या कसोटीत 300 हून अधिक धावांचा विजय मिळवण्याची ही दुसरी वेळ आहे.