भारतीय मेट्रो उद्या रचणारा नवा इतिहास

कोलकाता : भारतात प्रथमच पाण्याखालून मेट्रो धावणार आहे. कोलकाता मेट्रोचा हावडा मैदान-एस्प्लेनेड हा टप्पा मेट्रो प्रवासासाठी शुक्रवार दि. 15 मार्च 2024 पासून प्रवाशांसाठी सुरु होत आहे. कोलकाता येथील पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पाचे पाण्याखालील 2.9 किलोमीटर लांबीचे दोन जुळे बोगदे आणि हावडा मैदान, हावडा स्टेशन आणि न्यू महाकरण अशी तीन भूमिगत स्थानके बांधली आहेत. कोलकाता येथील हुगळी नदीच्या खालील बोगद्यातून उद्या 15 मार्च रोजी जेव्हा मेट्रो धावेल तेव्हा भारतातील मेट्रो वाहतुकीत नवा इतिहास रचला जाईल.