रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया : (RBI) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांसाठी मोठ्या प्रमाणात भरती काढण्यात आली आहे. 450 जागांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. सहाय्यक पदांसाठी ही भरती होणार आहे. www.rbi.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.अर्ज ऑनलाईन करावा लागेल अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2023 आहे. 13 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर ही आहे. अर्ज करताना परीक्षा शुल्कही जमा करावे लागणार आहे.
21 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबरला पूर्वपरीक्षा घेतली जाईल. मुख्य परीक्षा 2 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. ही पदे भरण्यासाठी, RBI देशव्यापी स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करेल. सर्व प्रथम प्राथमिक परीक्षा होईल. यामध्ये, यशस्वी उमेदवारांना मुख्य परीक्षेत बसावे लागेल आणि त्यानंतर त्यांना भाषा प्राविण्य चाचणी देखील द्यावी लागेल
रिक्त पदाचे नाव : सहाय्यक
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात किमान ५० टक्के गुणांसह बॅचलर पदवी असणे अनिवार्य असेल. ओबीसी, एससी आणि एसटीसाठी ५० टक्के अट नाही, फक्त उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
संगणकावरील वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
किमान 20 वर्षे, कमाल 28 वर्षे. 1 सप्टेंबर 2023 पासून वयाची गणना केली जाईल. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 02 सप्टेंबर 1995 पूर्वी आणि 01 सप्टेंबर 2003 नंतर झालेला नसावा. अनुसूचित जाती-जमातींना वयात ५ वर्षांची आणि ओबीसींना तीन वर्षांची सूट दिली जाईल.
इतका पगार मिळेल?
सुरुवातीचा मूळ पगार रु. 20,700/- प्रति महिना असेल. यानंतर वेतनश्रेणी 20700 – 1200 (3) – 24300 – 1440 (4) – 30060 – 1920 (6) – 41580 – 2080 (2) – 45740 – 2370 (3) – 52850 – 2500 – 2500 (250) वर्षे असेल. ). आणि इतर भत्ते जसे की DA, TA इ.
अर्ज शुल्क :
अर्ज फी – रु 450 (सामान्य, OBC, EWS) आणि GST
SC, ST, दिव्यांग – 50 रुपये अधिक GST.
जाहिरात: पाहा
Online अर्ज: Apply Online