शेअर बाजार : भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय शेअर बाजारात सध्या T+1 सेटलमेंट पद्धत लागू आहे. याबाबत SEBI ने आज शेअर बाजारात त्याच दिवशी शेअर्सची सेटलमेंट लागू करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. याचा अर्थ असा की ऑर्डरच्या अंमलबजावणीच्या 24 तासांच्या आत शेअर्स आणि रोख रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. T+0 सेटलमेंट 28 मार्च रोजी लागू केली जाईल अशी माहिती SEBI ने दिली आहे.
सर्व गुंतवणूकदार T+0 सेटलमेंट सायकलमध्ये सहभागी होण्यास पात्र असतील. T+0 सायकलमध्ये ट्रेडिंग 9.15 ते 1.30 वाजेपर्यंत असेल. T+0 सेटलमेंटच्या पहिल्या टप्प्यात त्याच दिवशी सेटलमेंट लागू केले जाईल, त्यानंतर शेअर खरेदीदारांना त्याच दिवशी शेअर त्यांच्या डीमॅट खात्यात पोहोचतील आणि विक्रेत्यांना त्याच दिवशी पैसे मिळतील.
जर तुम्ही दुपारी 1:30 पर्यंत शेअर्सची खरेदी किंवा विक्री केली तर त्यांचे सेटलमेंट संध्याकाळी 4:30 पर्यंत होईल. सध्या, बाजार भांडवलाच्या दृष्टीने टॉप-500 लिस्टेड कंपन्यांमध्ये ट्रेडिंगसाठी T+0 सेटलमेंट सिस्टम लागू होईल.