Share Market Closing: भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी खूपच निराशाजनक राहिला आठवड्यातील सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण दिसून आली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स सुमारे १,१०० अंकांनी कोसळला. तर निफ्टी २४,९०० च्या खाली घसरला. आज सर्व क्षेत्रात विक्रीचा जोरदार मारा झाला. विशेषतः बँकिंग, एनर्जी आणि आयटी शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव राहिला बाजारातील आजच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे ५ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ४६०.५९ लाख कोटी रुपयांवर आले.
क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी पीएयसू बँक (Nifty PSU Bank) ची सर्वात खराब कामगिरी राहिली. हा निर्देशांक ३.५ टक्क्यांनी घसरला. यावर इंडियन बँक, कॅनरा बँक, एसबीआय, बँक ऑफ बडोदा आणि पीएनबी हे शेअर्स ३ ते ५ टक्क्यांनी घसरले. ऑईल आणि गॅस, टेलिकॉम, आयटी, रियल्टी, कॅपिटल गुड्स देखील घसरून बंद झाले. बीएसई मिडकॅप १.४ टक्क्यांनी घसरला. तर स्मॉलकॅप सुमारे १ टक्के घसरला.