भारत-अमेरिका संबंधासाठी मोदी सर्वोत्तम नेते : मेरी मिलबेन

वॉशिंग्टन:  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांदरम्यानच्या उत्तम संबंधांसाठी सर्वोत्कृष्ट नेते आहेत, असे प्रख्यात आफ्रिकन-अमेरिकन हॉलीवूड अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेन यांनी म्हटले आहे. त्यांना पुन्हा निवडून आलेले बघण्याची अमेरिकेतील अनेक लोकांची इच्छा आहे, त्यामुळे दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक दृढ होत राहतील, असेही त्या म्हणाल्या.पंतप्रधान मोदी हे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत विजयाच्या मार्गावर आहेत, असा विश्वासही ४१ वर्षीय मिलबेन यांनी व्यक्त केला.

आफ्रिकन युनियनला जी-२० समूहात सहभागी करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी ठेवल्यानंतर मेरी मिलबेन यांनी त्यांचे आभार मानले होते मिलबेन या लोकप्रिय आफ्रिकन अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री असून, त्यांनी राष्ट्रगीत जन गण मन आणि ओम जय जगदीश हरे हे लोकप्रिय गाणे सादर केल्यानंतर त्यांचे भारतात खूप चाहते आहेत. भारत २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी जात आहे. अमेरिकेत या नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. मिलबेन अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देत आहे.

निवडणुकीचा हंगाम अमेरिका, भारत आणि जगासाठी सर्वात महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या सर्वांवर एक मोठी जबाबदारी आहे आणि ती पार पाडत आहोत, असेही त्या म्हणाल्या. आपण नागरिक म्हणून बोलले पाहिजे, आपले मत सामायिक केले पाहिजे, हे आपल्या देशांसाठी व नेत्यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत, असे त्या म्हणाला.