आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) महिला -आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. – ही स्पर्धा १९ ते २८ जुलै दरम्यान श्रीलंकेतील – डाम्बुला शहरात खेळविली जाणार आहे. भारत व पाकिस्तान एकाच गटात असून या दोन्ही – संघांदरम्यानचा बहुप्रतीक्षित सामना २१ जुलै रोजी होणार आहे. महिला आशिया चषक स्पर्धेनंतर सप्टेंबरमध्ये – महिला टी-२० विश्वचषक स्पर्धाही होणार आहे. ही विश्वचषक स्पर्धा बांगलादेशात होणार आहे. अशा स्थितीत आयसीसी स्पर्धेपूर्वी आशिया चषक – ही आशियाई संघांसाठी तयारीची शेवटची संधी – असेल. शेवटची आशिया चषक स्पर्धा २०२२ मध्ये – बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या – कालावधीत ७ संघांनी भाग घेतला. यावेळी स्पर्धे = त एका संघाने वाढ करून ८ संघ करण्यात आले. – सर्वात यशस्वी भारतीय संघाशिवाय स्पर्धेत २०१८ – चा विजेता बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, – थायलंड, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरात – (युएई) सुद्धा आहेत. सलामीचा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात – होणार आहे या स्पर्धेचा सलामीचा सामना भारत – आणि नेपाळ १९ जुलै रोजी होणार आहे. त्याच दिवशी पाकिस्तानचा सामना यूएईशी होणार आहे. चारही संघ अ गटात आहेत. तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया आणि थायलंड आहेत. दोन्ही गटातील अव्वल २-२ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. दोन्ही बाद फेरीचे सामने २६ जुलै रोजी, विजेत्या संघांमधील अंतिम सामना २८ जुलै रोजी होणार विश्वचषकात दोन्ही संघ शेवटच्या वेळी आमनेसाम ने आले होते.
महिला टी-२० क्रिकेटमध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात १४ सामने खेळले गेले असून भारताने ११ सामने जिंकलेत आणि पाकिस्तानने केवळ तीन सामन्यात विजय नोंदविलो होते. या दोन्ही संघांदरम्यानचा शेवटचा सामना फेब्रुवारी २०२३ मध्ये केपटाऊनच्या मैदानावर टी-२० विशचषकादरम्यान झाला होता व हा सामना भारताने ७ गडी राखून जिंकला होता. आशिया चषकात दोन्ही संघादरम्यान शेवटचा सामना झाला होता व त्यात पाकिस्तानने १३ धावांनी विजय मिळवला होता. वेळापत्रक असे- १९ जुलै : पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, भारत विरुद्ध यूएई, २० जुलै : मलेशिया विरुद्ध थायलंड. श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, २१ जुलै : नेपाळ विरुद्ध यूएई. भारत विरुद्ध पाकिस्तान, २२ जुलै : श्रीलंका विरुद्ध मलेशिया. बांगलादेश विरुद्ध थायलंड, २३ जुलै पाकिस्तान विरुद्ध यूएई. भारत विरुद्ध नेपाळ, २४ जुलै : बांगलादेश विरुद्ध मलेशिया. श्रीलंका विरुद्ध थायलंड, २६ जुलै : दुसरी उपांत्य सामना, २८ जुलै : अंतिम सामना