मुंबई : बांगलादेशात इस्लामिक कट्टरतावाद्यांचे हिंसक आंदोलन सुरु असतानाच भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफच्या हालचालींना वेग आल्याचे दिसते आहे. भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफच्या सुरक्षा आणि ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्याकरीता बीएसएफचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांनी त्रिपुरा येथे बुधवार, दि. ०७ ऑगस्ट रोजी भेट दिली.
बीएसएफचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी हे आयपीएस एडीजी रवी गांधी यांच्यासमवेत भारत-बांग्लादेश सीमेवरील बीएसएफच्या सुरक्षा आणि ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यासाठी बीएसएफ सालबागन, आगरतळा, त्रिपुरा या फ्रंटियर मुख्यालयाच्या एक दिवसीय भेटीवर आले होते.
यादरम्यान झालेल्या बैठकीत आयजी त्रिपुरा फ्रंटियर यांनी बीएसएफ महासंचालकांना ऑपरेशनल ब्रीफिंग दिली. त्यानंतर बीएसएफ महासंचालकांनी बांगलादेशातील सध्याची कायदा आणि सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या परिस्थितीवर त्याचा परिणाम यावर चर्चा केली. ऑपरेशनल तयारीचा आढावा घेताना, सीमांचे रक्षण करण्यासाठी अथक प्रयत्न आणि समर्पण आणि बीएसएफ त्रिपुराने भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरी आणि सीमापार गुन्हे प्रभावीपणे रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. बैठकीदरम्यान बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.