भारत २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवेल: केंद्रीय मंत्री हरदीपसिंग

चांद्रयान-३ : ही केवळ सुरुवात आहे आणि भारताने २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठविण्याचा संकल्प केला आहे. देश २०४७ पर्यंत या क्षेत्रात विकसित होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली. इस्रोच्या गगनयान मिशनमध्ये तीन जणांना अंतराळात पाठविण्याची परिकल्पना आहे. मानवाला पृथ्वीच्या कक्षेत ४०० किलोमीटर उंचीवर पाठवले जाईल. हे मिशन तीन दिवस चालेल आणि त्यानंतर क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणून त्यांचे इस्रोला मोठे यश मिळाले गगनयान मोहिमेअंतर्गत एकूण तीन अंतराळ मोहिमा पाठविण्यात येणार आहेत.

यातील दोन मोहिमा मानवरहित असतील आणि एक मानवयुक्त असेल. अलिकडेच चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्युल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात आले. मानवी मोहिमेसाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची होती. याबद्दल पंतप्रधान मोदींनी इस्रोचे अभिनंदन केले. चांद्रयान-३ मिशन १४ जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आले आणि २३ ऑगस्ट रोजी त्याचे विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या उतरले.समुद्रात सुरक्षितपणे लॅण्डिंग केले जाईल. असे केल्याने अंतराळात मानव पाठवणारा भारत हा जगातील चौथा देश बनेल. भारतापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने ही कामगिरी केली आहे. २०४० पर्यंत गगनयान मिशन अंतराळात पाठवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.