भाविकांची ही प्रतीक्षा संपली, शिवमहापुरान कथा आजपासून जळगावात

जळगाव:अनेक दिवसांना पासून भाविक शिवमहापुरान कथेच्या प्रतिक्षेमध्ये होते  व भाविकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे.  जळगाव येथून सात कि.मी. अंतरावरील कानळदा मार्गावरील वडनगरी फाट्याजवळ बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला मंगळवार, 5 डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. सोमवार, 4 रोजी पंडित प्रदीप मिश्रा यांचे जळगाव येथे आगमन झाले. आयोजकांसह शहरातील प्रतिष्ठितांनी त्यांचे स्वागत केले. कथा श्रवण करण्यासाठी भाविकांचे मोठ्या प्रमाणात जळगावात आगमन होत आहे. त्यामुळे सर्वत्र शिवमय वातावरणाची अनुभूती शहरवासीयांना येत आहे. आज लाखो भाविक शहरात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून कथेच्या परिसरात अलर्ट आहे. या ठिकाणी 24 तास यंत्रणा गतिमान असणार आहे.