भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, 21 जणांचा मृत्यू 40 जण जखमी..

by team

---Advertisement---

 

भाविकांना घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळल्याने २१ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ४० हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पाहा कुठे घडली ही घटना.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथून भाविकांना घेऊन जाणारी एक बस जम्मूतील अखनूर येथील तांडा भागात रस्त्यावरुन थेट खोल दरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २१ भाविकांचा मृत्यू झालाय तर ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बस सुमारे १५० फूट खाली खड्ड्यात कोसळली आहे. इतर भाविकांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

जम्मू जिल्हा दंडाधिकारी यांनी ट्विटरवर माहिती दिली की, “उत्तर प्रदेशातील हाथरस येथून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला जम्मूच्या अखनूरमधील तांडाजवळ अपघात झाला आहे. बचाव कार्य सुरू आहे.”

अपघातात जखमी झालेल्या लोकांना जम्मूच्या अखनूर हॉस्पिटल आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मूचे नायब राज्यपाल यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. एलजीच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “अखनूर, जम्मू येथे झालेला बस अपघात हृदय हेलावणारा आहे. मी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतो आणि शोकाकुल कुटुंबांना हे अपूरणीय नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.” जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---