भीषण अपघात, बसने 3 विद्यार्थ्यांना चिरडले, नंतर खड्ड्यात पडली

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भीषण रस्ता अपघात झाला. येथे भरधाव वेगात असलेल्या रोडवेज बसने दुचाकीस्वार विद्यार्थ्यांना धडक देऊन चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर रोडवेज बसचे नियंत्रण सुटून ती खड्ड्यात पडली. रोडवेज बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुटका झाली. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून अन्य जखमींचा शोध घेत आहेत.