भीषण अपघात ! भरधाव वाहनाची सायकलस्वाराला धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर

नंदुरबार : भरधाव वाहनाने एका ६० वर्षीय सायकलस्वाराला उडवल्याची घटना ताजी असताना, आणखी २ जणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे.

शहरातील मिराज-सिनेमा ते कोकणी हिल परिसरात रस्त्यानजीक हा भीषण अपघात झाला. भरधाव वाहनाने एका ६० वर्षीय सायकलस्वाराला उडवल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. आणखी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या २ जणांना चिरडलं असल्याची घटना घडलीय. त्यात एक १२ वर्षाचा मुलगा आणि त्याच्या आईचा समावेश आहे.

या दोघांनाही उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्या दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने वाहन चालकाचा मृत्यू
वाहन चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा वाहनावरील ताब्यात सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वाहन चालकाचा मृत्यू देखील झालेला आहे.