---Advertisement---
झिम्बाब्वेमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात भारतीय उद्योजक हरपाल रंधावा, त्यांचा मुलगा आमेर कबीर सिंह रंधावा यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला आहे.
वृत्तनुसार, रियोजिमच्या मालकीच्या सेसना 206 हे विमान हरारे ते मुरोवा हिरा खाणीच्या दिशेने जात होते. या खाणीची मालकी रियोजिम कंपनीकडे आहे. त्यावेळी हा अपघात घडला. सिंगल इंजिन असलेले विमान मुरोवा डायमंड खाणीजवळ अपघातग्रस्त झाले. या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हवेतच स्फोट झाला. या अपघातात विमानाचे पायलटसह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.
अपघातात ठार झालेले चार जण परदेशी नागरीक होते, तर इतर दोघे झिम्बाब्वेचे नागरिक होते. या अपघातामुळे झिम्बाब्वेमधील उद्योगजगतावर, भारतीय समुदायावर शोककळा पसरली आहे.
---Advertisement---