---Advertisement---

भुसावळमध्ये फळांच्या गोडावूनला भीषण आग, नऊ दुकाने जाळून खाक

by team
---Advertisement---

भुसावळ:   येथील डेली मार्केट परिसरात फळांच्या गोदामाला अचानक रविवारी २५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली.या आगीत फळांची साठवणूक केलेले नऊ दुकाने जाळून खाक झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले,ही आग सकाळी पाच वाजता लागलेल्या आगीमुळे खळबळ उडाली. या घटनेत कुठलीही जीवितहानी नाही मात्र फळ व्यपाराचे लाखोंचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील डेली मार्केट हा परिसर फळाच्या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी फळांची साठवून करणारे १० ते १५ दुकाने आहेत. दरम्यान रविवारी २५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता फळांच्या गोडावूनला अचानक आग लागली. ही आग कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान या आगीमुळे गोडावूनजवळील इतर फळांची साठवणूक केलेले ९ दुकाने जळून खाक झाले आहे.

अग्नीशमन विभागाच्या बंबाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवत हानी झाली नसली तरी व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या आगीबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात आगीबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment