भुसावळहून वंदे भारत सुरू करण्याचा प्रस्ताव सादर!

xr:d:DAFe8DR0y38:2510,j:8382748804592421980,t:24040607

जळगाव : गेल्या दहा वर्षातील कामाचा लेखाजोखा पाहता पक्षाने मला लोकसभेच्या तिसन्या टर्मसाठी संधी दिली आहे. या तिसऱ्या टर्ममध्ये भुसावळ येथून बंदे भारत एक्सप्रेससाठी प्रयत्न करणार असून तसा प्रस्तावही केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. या बरोबरच गत काळात सिंचनासह केळी उत्पादकांचेही प्रश्न सोडविले असल्याची भूमिका खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केले.’तरुण भारत’ च्या या भेटीप्रसंगी त्यांनी दहा वर्षातील लेखाजोखा सादर केला.

यावेळी प्रारंभी सर्जना मीडिया सोल्युशन प्रा.लि.चे अध्यक्ष रविंद्र ला, सहप्रकल्प प्रमुख संजय नारखेडे निवासी संपादक चंद्रशेखर जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. तर विपणन व्यवस्थापक मनोज बोरसे, विपणन सहाय्यक गायत्री कुलकर्णी उपस्थित होते.चांगल्या कामाची पक्षाकडून दखल पुढे बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, लोकसभेचे तिकिट मिळेल की नाही याबाबत मनात धाकधुक होतीच. कारण गेल्या सहा महिन्यांपासून जे वातावरण सुरू होत ते पाह‌ता चिंता वाटत होती.

कारण आपले सासरे नाथाभाऊ एनसीपीत गेले होते. त्यामुळे पक्ष तिकिट देणार नाही म्हणून मी पण एनसीपीत जाईल असे वातावरण तयार झाले होते. अशा विविध अफवा पसरत होत्या. जस जसे दिवस जवळ येत होते तस तसे काही ठराविक लोकांचा विश्वासही वाढत होता की ताईंच तिकिट हे जाणास्व आहे. पण मनात विश्वास होता की मी गेल्या दहा वर्षात जी कामे केलीत आहेत. त्यावरून वाटत होतं की पक्ष आपला निश्चित विचार करेल. मी पक्षांचे ज्येष्ठ नेते, स्थानिक नेते व जनता यांनी विश्वास दाखवला, भाजपच्या सर्व्हेत माझा क्रमांक वर आला.मोदीच्या संदेशाचे पालन २०१४ ते २०१९ व २०१९ ते २०२४ या दहा वर्षात मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

आमच्या बैठकांमध्ये मोदीसाहेब नेहमी सांगत की लोकामध्ये तुमच्या पातळीवर समाजकार्यही करणे गरजेचे आहे. सोशल अॅक्टिव्हिटीही करणे गरजेचे केळी प्रश्नाला प्राधान्य विमानतळावरून विमानसेवेसाठी आम्ही दिल्लीत प्रयत्न करत आहे. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. त्यानुसार लोकांशी संपर्क केला आहे. केवळ निवडणूका म्हणून गाठीभेटी घेणे नाही तर सतत जनतेच्या अडिअडचणीच्या काळात त्यांच्या गावी जात असे.रावेर लोकसभा क्षेत्रात स्स्त्याचे जाळे या दहा वर्षात रावेर लोकसभा मतदार संघात रस्त्याची कनेक्टिव्हिटी करण्यात आली. चिखली तरसोद महामार्ग, बन्हाणपूर ते मुताईनगर, मुक्ताईनगर ते पहूर, जळगाव, जामनेर ते छत्रपती संभाजीनगर, मुसावळ ते यावल हे रस्ते तयार झाले आहेत. विमानतळ, सिंचनाची कामे,महत्वाकांक्षी बोदवड उपसा योजनेच्या एका टप्प्याचे काम प्रगतीत आहे.

यामुळे मोठा सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. मेगा रिचार्ज ही योजनाही फार मोठी आहे. लाखो हेक्टर जमिन यामुळे ओलिताखाली येईल. यासाठी केंद्राकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्याला योजनेचा लाभ होणार आहे. केळी पिक विम्यासाठी व त्या माध्यमातून केळी उत्पादक शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल यासाठी आपण प्रयत्न केले व भविष्यातही ते सुरू राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यातही यामुळे मतदार संघातील जनता आपल्याला साथ देईल असेही त्या शेवटी म्हणाल्या

बहऱ्हाणपूर ते अंकलेश्वर रस्त्याचे लक्ष
या टर्ममध्ये बहुचर्चित बन्हाणपुर ते अंकलेश्वर रस्त्याच्या कामासाठी अनेक अडवणी आल्यात. त्या दूर करून पीएमओकडून मंजुरी मिळाली आहे. लोकसभा निवडणूकीनंतर त्याची निविदा निघणार आहे. हा रस्ता जसा पुर्वी होता तसाच रावेरमधून राष्ट्रीय महामार्ग होणार आहे, रावेर व बन्हाणपूर हे केळी उत्पादक दक्षेत्र आहे. त्यामुळे त्यांना या महामार्गाचा उपयोग होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सव्र्व्हेवर उमेदवारी

दरवेळेस पक्षांतर्गत सव्र्व्हे होत असतो त्यावेळेच त्याला कमी महत्त्व दिले गेले. मात्र यावेळेस जास्त महत्त्व दिले गेले. यात लोकांनी माझं नाव पुढे ठेवले आणि ही उमेदवारी मिळाली. पक्षाच्या सूचनांचे सतत पालन करत राहिले. आमचे नेते ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या सूचनांप्रमाणे सतत कामे करत राहिले त्याचेच फळ मिळाले