मंडीतील अवैध मशिदीखाली महादेव मंदिर असल्याचा स्थानिकांचा दावा

मंडी : हिमाचल प्रदेशातील मंडी येथे अवैध मशीदीप्रकरणी शहरातील जेलरोड येथे ४५ चौरस मीटर मशीद बांधण्यात आली. नंतर अवैध भाग पाडून मंडी महानगरपालिकेची मान्यता न घेता २३१ चौरस मीटरवर बांधकाम केले. या प्रकरणाची बाब पालिकेने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालातून समोर आली आहे. याप्रकरणी निकालाआधी महापालिका आय़ुक्तांनी चौकशीसाठी सहायक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. तसेच संबंधित मशीदीखाली शिवालय असल्याचा दावा हिंदूंनी केला आहे.

अहवालात मुस्लीम समुदायतील नागरिकांनी मशिदीजवळ केवळ ४५ चौरस मीटर जागा असल्याची माहिती दिली. मात्र त्यानंतर कचट्टरपंथींनी २३१ चौरस मीटर जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करून दुमजली मशीद बांधली. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाची जमीनही त्यांनी बळकवण्याचे काम केले. मात्र आता बेकायदेशीर मशिदीचा भाग काढा असे महापालिकेने त्यांना नोटीसा जारी केल्या होत्या.

महापालिकेने जारी केलेली नोटीस मंडी येथील मुस्लीम कल्याणकारी समुदायाचे सदस्य इक्बाल अली यांनी सांगितले होते की, निर्णयाची प्रत मिळाली आहे. रात्री समितीच्या बैठकीत यावर चर्चा होणार असून याप्रकरणी पुढील माहिती सांगू असे सांगण्यात आले.

जिल्हा मुख्य़ालयातील जेलरोड येथे असलेल्या मशिदीखाली भगवान महादेवाचे मंदिर असल्याचा दावा शहरातील हिंदू रहिवाशांनी केला. बेकायदेशीर बांधकाम विभागाची जमीन अवैध मशिदीच्या ठिकाणाहून रस्त्याचे काम सुरू आहे. त्याठिकाणी रस्त्याचे रूंदीकरण करण्याआधी पुरातत्व विभागाच्या निदर्शनाखाली उत्खनन केले असून मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.