---Advertisement---

मंत्री रक्षा खडसे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेतर्फे सत्कार

by team
---Advertisement---

जळगाव :  महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणी शिष्टमंडळाच्या वतीने केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांचा मुक्ताईनगर येथे सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले. त्यांचे स्वीय सहाय्यक तुषार राणे यांनी निवेदन स्वीकारले. मध्य प्रदेश व गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या सर्व संगणक परिचालकांना राज्य कर्मचारी म्हणून दर्जा देणे व त्यानुसार वेतन व इतर भत्ते देण्याबाबत केंद्रीय पंचायतराज मंत्रालय, व ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना पत्र दिले जाईल असे आश्वासन त्यांच्याकडून शिष्टमंडळास देण्यात आले.  यावेळी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्रावण बोदडे, जिल्हा उपाध्यक्ष कन्हैया पाटील, जिल्हा संघटक प्रभाकर तायडे, जिल्हा संपर्कप्रमुख रौनक तडवी, जिल्हा कोषाध्यक्ष तुषार चौधरी, राज्य प्रतिनिधी राहुल मोरे, जिल्हा सहसचिव दिगंबर पवार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment