मंत्री रक्षा खडसे यांचे भुसावळ रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत

भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांची क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री पदी वर्णी लागलेत आहे. मंत्रिपदाचा कार्यभाग स्वकारल्यानंतर त्या प्रथमच आपल्या मतदार संघात शनिवार, १५ जून रोजी परतल्या आहेत. यावेळी त्यांनी पहिली प्रतिक्रिया देतांना आपणास मतदारसंघासह राज्य व देशासाठी काम करावयाचे असल्याची भावना व्यक्त केली

मंत्री रक्षा खडसे यांचे ढोल ताशांच्या गजरात भुसावळ रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी रक्षाताई आगे बढो हम तुम्हारे साथ है , भारतीय जनता पार्टीचा विजय असोच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मंत्री रक्षा खडसे यांनी मतदार संघात आल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, मंत्रिपद मिळाले याचा मला आनंद आहे, मला मंत्रिपद मिळाले याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. मी खासदार म्हणून काम पहिले आहे. यावेळी देखील मला तशी कोणतीही अपेक्षा नव्हती. परंतु, पक्ष, पंतप्रधान मोदी व जनतेच्या आशीर्वादाने मला मंत्रिपद मिळाले आहे. लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत.  मला मतदार संघा सोबत राज्य व देशासाठी काम करायचे आहे. खासदार म्हणून काम करण्यापेक्षा मंत्री म्हणून काम करण्याचे मोठे आव्हान आहे. मागील दोन तीन दिवसांत मी खात्याचा आढावा घेतला. देशात चांगले खेळाडू पुढे येत आहेत. ऑलम्पिक मध्ये चांगले मेडल खेळाडू आणत आहेत त्यांना आपण प्रोत्सहन देणार असल्याच्या त्या म्हणाल्या.