जळगाव : मकर संक्रांती, हा एक भारतीय सण आहे जो संपूर्ण देशात साजरा केला जातो आणि आनंदाने भरलेला असतो. या पार्श्वभूमीने पोदार प्रेप येथे एक अनोखा सोहळा पार पडला. अर्थात “पतंगांचा उत्सव” या कार्यक्रमाने एक प्रकारचा उत्सव साकारला.
पोदार प्रेप हा उत्सव “पतंगांचा उत्सव” या थीमसह साजरा केला. मकर संक्रांतीच्या सणावर एखादी सुंदर गोष्ट, पतंग जुळवणे आणि गाणी म्हणणे यासारख्या मजेशीर उपक्रमांमध्ये मुले सहभागी झाले. कार्यक्रमाच्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक गोकुळ महाजन यांचे अमूल्य मार्गदर्शन आणि मुख्याध्यापिका उमा वाघ यांचे सहकार्य आणि पोदार प्रेप, जळगाव येथील शिक्षकांच्या अथक परिश्रमाला होते. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.