मुंबई,
Manipur violence मणिपूरमध्ये दोन महिलांवर नग्नावस्थेत रस्त्यावर फिरविण्याचाय घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. तसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावरती निषेध वक्त केला आहे. मणिपूरची राजधानी इंफाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी ही घटना घडली. बुधवारी सायंकाळी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आणि तेव्हापासून सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
आता या घटनेवरून बॉलिवूड स्टार्सची नाराजी आणि संतापही समोर आला आहे. यावर अक्षय कुमार, रितेश देशमुख यांसारख्या स्टार्सनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. देशी आदिवासी नेते मंच (ITLF) ने आरोप केला आहे की दोन महिलांवर शेतात सामूहिक बलात्कार करण्यात आला. या दोन्ही महिला कुकी जमातीतील आहेत.पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने ट्विट केले की,
अक्षय कुमार – ‘मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या व्हिडिओने देश द्वेषाने आणि संतापाने हादरला आहे. मला आशा आहे की या आरोपींना अशी शिक्षा होईल की भविष्यात असे घृणास्पद कृत्य करण्याचा विचारही कोणी करू शकणार नाही.
रितेश देशमुखनेही –सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत लिहिले की, ‘मणिपूरमध्ये महिलांसोबत घडलेल्या घटनेचा व्हिडिओ पाहून मला धक्का बसला आहे. असा गुन्हा करणार्या कोणत्याही माणसाला सोडले जाऊ नये. महिलांच्या सन्मानावर हल्ला करणे म्हणजे मानवतेवर हल्ला करण्यासारखे आहे.त्याचवेळी बॉलिवूड
आशुतोष राणानेही- या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा कोणत्याही घुसखोराने एखाद्या महिलेचे अपहरण केले तेव्हा संपूर्ण मानवजातीला त्याची किंमत चुकवावी लागली. सरकारी सूत्रांचा हवाला देत एएनआयने माहिती दिली आहे की सरकारने फेसबुक-ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला हा व्हिडिओ शेअर न करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओसाठी केंद्र सरकार ट्विटरवर कारवाई करू शकते.