मतदानापूर्वी दिल्लीत काँग्रेसला धक्का, माजी प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली, शीला सरकारमधील माजी मंत्री राजकुमार चौहान, माजी आमदार नसीब सिंह, माजी आमदार नीरज बसोया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अरविंदर सिंग लवली यांनी नुकताच दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. लवली काँग्रेसने आम आदमी पार्टीसोबत युती करण्याच्या विरोधात होते. ते यापूर्वीही भाजपमध्ये होते. यापूर्वी 2017 मध्ये, लवलीने दिल्ली महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता, परंतु काही महिन्यांतच ते काँग्रेसमध्ये परतले.