---Advertisement---

मदरशात मौलवी करायचा अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार, परिक्षेत नापास करण्याची दाखवायचा भीती

by team

---Advertisement---

मदरशात अल्पवयीन विद्यार्थीनीला परिक्षेत नापास करेल अशी भीती दाखवून पीडितेवर मौलवीने अनेकदा अत्याचार केले. पीडित विद्यार्थीनीचे वय हे १३ वर्षे असून मौलवी अनेकदा पीडितेला त्याच्या खोलीत घेऊन जात असे आणि पीडितेवर क्रूर अत्याचार करत असे. पीडितेवर मौलवीने अनेकदा शारिरीक शोषण केले असून मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील एका मदरशातील आहे.

प्रासारमाध्यमानुसार, हे प्रकरण गाझियाबाद जिल्ह्यातील असून अंकुर विहार पोलीस ठाणे परिसरातील आहे. पीडित विद्यार्थ्यांच्या वडिलांनी मंगळवारी डाबर ठाणे परिसरात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी सांगितले की, त्यांच्या मदरशात १३ वर्षीय विद्यार्थींनी काही दिवसांपासून धार्मिक शिक्षण घेत होती. हा विद्यार्थीनी या मदरशात वसतीगृहात इतर अनेक वर्गमित्रांसह राहत होता. मौलवीने अल्पवयीन विद्यार्थींनींवर वाईट नजर ठेऊन रात्रीच्या वेळी तो विद्यार्थींनीला त्याच्या खोलीत बोलावून तिच्याशी गैरवर्तवणूक करायचा.

 

 

तक्रारीत सांगितले की, जेव्हा मौलवीच्या विद्यार्थीनीने या कृतीचा प्रतिरोध केला असता तेव्हा मौलवीने पीडित विद्यार्थींनीला नापास करण्याची धमकी देऊन शांत बसवायचा. पीडितेने याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची भाषाही तो करायचा. या धमक्यांना घाबरून पी़डित विद्यार्थींनीला घडलेला प्रकार कोणालाही सांगण्याचे धाडस होत नव्हते. मात्र काही दिवसांनी पीडितेने याबाबत घडलेला सर्व प्रकार आपल्या घरी सांगितला होता. यावेळी पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली असता मौलाना साकीबवर कठोर कारवाईची मागणी केली.

पोलिसांनी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून एफआऱआय दाखल केला. त्यामध्ये मौलवी साकीबचे नाव नमूद करण्यात आले असून पोक्सो कायद्यांसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत साकीबवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात एसपी भास्कर वर्मा यांनी मंगळवारी य़ा घटनेला दुजोरा दिला आणि आरोपी मौलवी साकीबला अटक करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---