चोपडा: मध्यप्रदेशातून साडेसहा लाख रुपयांचा गुटखा वाहून नेणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीला चोपडा ग्रामीण पोलिसांकडून , शेंदवा धुळे महामार्गावर जप्त करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक असलेला गुटका मध्यप्रदेशातून ऐका बोलेरो गाडीत किराणा मलासह धुळे शहराच्या दिशेने वाहून नेत असल्याची गुप्त माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, दि. 21 च्या मध्यरात्री चोपडा शिरपूर मार्गावरील हातेड फाटा या ठिकाणी पोलीसांनी सापळा लावला. यावेळी पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहनांची तपासणी पोलीसांनी केली असता त्यामधून ६ लाख ७८ हजार रुपये किमतीचा घुटका असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनासह आरोपी प्रशांत मानीको भिल (रा. हेकंयवाडी ता. जि. धुळे) यास मुददेमालसह ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सहायक पोलीस निरीक्षक नितनवरे, पोलीस कॉन्सटेबल शशी पारधी, मनीश गावीत, संदिप निळे यांनी हि कारवाई केली आहे.