मध्य प्रदेशात द केरला स्टोरीची पुनरावृत्ती, कट्टरपंथी महिलेच्या मदतीने दानिशने केले हिंदू मुलीवर अत्याचार

भोपाळ : कट्टरपंथी महिलेची मदत घेत हिंदू मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात घडली आहे. दानिश नावाच्या कट्टरपंथी तरूणाने हिंदू मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. जॅकी पठाणच्या घरात हिंदू मुलीला बंद करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. जॅकी पठाणची पत्नी किरण आणि तिचा भाऊ निक्की पठाण यांचीही नावे आहेत. किरणने पोलिसांना याप्रकरणात नवीन माहिती दिली आहे. जॅकीसोबत विवाह करून हिंदू मुलगी कट्टरपंथी झाली. त्यानंतर किरणने त्या मुलीचे मतपरिवर्तन केले असल्याचे सांगितले आहे. घडलेली ही घटना दक्षिणात्य चित्रपट द केरला स्टोरीची पुनरावृत्ती आहे.

प्रसारमाध्यामांनुसार किरण पठाण याप्रकरणाच्या मास्टरमाईंड असल्याचे आढळून आले आहे. ती मूळची मुंबई येथील होती. तिची आणि जॅकी पठाणची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. त्यानंतर किरणने आपल्या कुटुंबाशी नातेसंबंद सोडले आणि तिने जॅकी पठाणला आपले मानले आणि इस्लाम स्वीकारला.

२८ वर्षीय किरणने शाजापूरमध्ये टेलरिंग शिकवायला सुरुवात केली. अनेक हिंदू मुलीही त्याठिकाणी टेलरिंग शिकायला येत होत्या. त्यावेळी या मुलींच्या मनावर अनेकदा इस्लाम धर्मांचे विचार बिंबवण्याचे काम केले गेले. तसेच यावेळी पीडित युवतीने टेलरिंगची शिकवणीचा क्लास सुरू केला होता. त्यावेळी किरण राजपूतने पीडितेला आपला मेव्हणा दानिशसोबत मैत्री करण्यास सांगितले.

सोशल मीडियावर पीडित मुलगी आणि दानिश यांच्यात बातचीत झाली. यानंतर दानिश अनेकदा पीडितेच्या घरी भेटायला जात असायचा, त्यावेळी पीडितेच्या कुटुंबियांना याप्रकरणात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला. त्यावेळी पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीला अनेकदा सुनावले होते. त्यावेळी पीडितेने दानिशपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. दानिश १० ऑगस्ट रोजी पीडितेच्या घरी पोहोचला. पीडितेच्या वडिलांनी मुलीला सुनावले आणि दानिशलाही सुनावले होते. त्यानंतर संतापलेली मुलगी किरणच्या घरी गेली. त्यावेळी त्याठिकाणी किरण राजपूतही होती. त्यावेळी किरणच्या सांगण्यावरून दानिशने तिला एका खोलीत जाण्यास सांगितले होते. जॅकी पठाण आणि त्याची बहिण निक्की पठाणच्या सांगण्यावरून पीडितेवर बलात्कार करण्यात आला.
यावेळी किरण राजपूत आणि तिचा पती जॅकी पठाणसह मेव्हणा दानिशने पीडितेच्या कुटुंबियांना मारहाण केली. त्यावेळी त्याठिकाणी काही हिंदू संघटना आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेतले आहे.