मनपा आयुक्तांच्या सूचना, विसर्जन मार्गाची दुरुस्ती करा

जळगाव: मेहरूण तलावाकडून काम सुरू करण्यात आले आहे,शहरातील गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविण्यात येणार आहे डॉ. विद्या गायकवाड यांनी सांगितले आहे.शहरात काही भागात रस्त्याची अतिशय दुर्दवी अवस्था आपल्याला पहिला मिळत आहे.वाहनधारकांची प्रचंड प्रमाणात हाल होताना आपल्याला दिसत आहे. आता गणेश विसर्जनही जवळ येत आहे.त्यामुळे शहरातील रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी विसर्जन मार्ग रस्त्याची नुकतीच पाहणी केली होती, त्या दृष्टीने त्यांनी विसर्जन मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याचा आदेश दिला आहे. आयुक्त डॉ. गायकवाड यांनी सांगितले, की शहरातील गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेहरूण तलाव येथे गणेश विसर्जन करण्यात येत असल्यामुळे तिकडून दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.

आयुक्त डॉ. गायकवाड यांनी सांगितले, की शहरातील गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेहरूण तलाव येथे गणेश विसर्जन करण्यात येत असल्यामुळे तिकडून दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.शहरातील काही रस्त्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आली आहेत. त्यामुळे त्या रस्त्यावरचे खड्डे बांधकाम विभाग बुजविणार आहेत. शिवाजीनगर पुलापासून तर दूध फेडरेशनचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे, त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बुजविण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली.