मनसे नेते वसंत मोरे, शरदचंद्र पवार गटाच्या वाटेवर ? पुण्यात घेतली शरद पवारांची भेट

पुणे: देश्यासह राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीबाबत सर्वच पक्ष्यांकडून जोरदार तयारी सुरु आहे. राज्यातील पुणे लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्ष्यांकडून तयारी करण्यात येत आहे.  गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे मनसेत नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. आणि आज त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे चर्चानी जोर धरला आहे.

अमित ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनलोकसभेची जबाबदारी दिली आहे. मनसेतून वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांनी उघडपणे आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. साईनाथ बाबर यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल. असे संकेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या निवडणुसंदर्भात दिले होते.

या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुणे लोकसभेवर वारंवार दावा सांगूनही उमेदवारी निश्चित होत नसलेले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये घुसमट होत असलेले तडफदार नेते वसंत मोरे यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आत नाराज वसंत मोरे शरद पवारांचा हात धरतील का ? अश्या चर्चा सुरु आहेत.

मात्र शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी ही राजकीय भेट नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.