मुंबई : आज सोमवार रोजी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मनसेची बैठक पार पडली.या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सेटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का? असा सवाल केला आहे. त्यानी धारावी पुर्नविकास प्रकल्पाविरोधात शनिवारी उबाठा गटाने धारावी ते बीकेसी येथील अदानी उद्योग समूहाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता.
याविषयी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की..राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “महाविकास आघाडीला आज का जाग आली? आठ दहा महिन्यानंतर त्यांनी आजच का मोर्चा काढला? सेटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.पुढे ते म्हणाले की, “आठ दहा महिन्यानंतर जागे झालेल्या महाविकास आघाडीने तिकडे नेमकं काय होणार आहे हा प्रश्न विचारला आहे का? की मोर्चाचा दबाव आणून त्यांना फक्त सेटलमेंट करायची आहे,” असे ते म्हणाले आहेत. तसेच मनसेच्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत सखोल चर्चा झाल्याचीही माहिती त्यांनी दिली.