मुंबई : मागच्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.त्यानंतर मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार या चर्च्यांनी जोर धरला होता. परंतु आता आठवडा होत आला, तरी मनसे नेमकी कुठे आहे? मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का? या प्रश्नांची उत्तर अजून मिळालेलीच नाहीत. याबात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलतांना मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, “आजची आमची बैठक फक्त गुढी पाडावा मेळाव्यासंदर्भात होती. जी माहिती तुम्हाला हवीय, त्यासाठी तुम्ही थोडी प्रतिक्षा करा. राजकारणात ज्याच्याकडे संयम आहे, तो पुढे जातो. दोन-चार दिवसात या प्रश्नांची उत्तर मिळतील” असं बाळा नांदगावकर म्हणाले. मनसे शिवसेनेमध्ये विलीन होऊन राज ठाकरे प्रमुख होणार का? या प्रश्नावर बाळा नांदगावकर म्हणाले की, “माझ्या माहितीप्रमाणे मीडियामध्ये ही चर्चा आहे. या बाबत चर्चा झाली असेल, तर पक्षप्रमुखांना या बद्दल माहिती असेल. या विषयावर आमच्याशी बोलण झालेलं नाहीय