मनोज जरांगेंची आज ‘निर्णायक बैठक’ ! अंतिम निर्णय घेणार ?

जालना : दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे, मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही जरांगे पाटील सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहेत.मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा 16 वा दिवस असून, मराठा समाजाची त्यांनी आंतरवाली सराटीत आज ‘निर्णायक बैठक’ बोलावली आहे. आज 12 वाजता ते बैठकीला संबोधित करून पुढील दिशा ठरवतील.

आज मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत ‘निर्णायक बैठक’ बोलावली आहे. आज 12 वाजता ते बैठकीला संबोधित करून पुढील दिशा ठरवतील. त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. सरकारकडून आपल्यावरती षडयंत्र रचल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही समाजविरोधी महत्वकांक्षी राक्षसांना उघड पडणार असल्याचे देखील ते म्हणाले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत मनोज जरांगे काय बोलतील आणि कोणत्या निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

जरांगे पाटील यांचे अंतरावलीसाठी मध्ये दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू आहे. आपण आमरण उपोषण सोडावं आणि आदेश द्यावा, रस्त्यावरची लढाई लढू या अशा प्रकारची विनंती मराठा बांधवांकडून पाटील यांना करण्यात येत होती. त्यामुळे आजच्या बैठकीत मनोज जरांगे उपोषण सोडून रस्त्यावरच्या लढाईचा निर्णय घेतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.