मनोज जरांगेंना ‘शरद पवार आणि रोहित पवार’ यांच्याकडून होतेय मदत ; संगीत वानखेडे यांचा दावा

Maratha reservation : मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जारांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टिका केली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जारांगेनवर SIT मार्फ़त चौकशी करण्याचे आदेश गृहखात्याला दिल आहे. अशातच संगीता वानखेडे यांनी शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांचं नाव घेत खळबजनक वक्तव्य केलं आहे.

संगीता वानखेड़े म्हणाल्या, मी आधीपण जारांगेनविरुद्ध SIT चौकशी करा हीच मागणी करत होते मराठा समाजाची दिशाभूल जरांगे यांनी केली असून आरक्षणात फसवणूक केली आहे. अनेक राजकीय नेत्याचा जरांगे पाटील यांना सपोर्ट आहे. जरांगे पाटलाची चौकशी झाल्यावर सगळं दूध कमी पाणी का पाणी होईल.

शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांच्याकडून जरांगे यांना मदत मिळत आहे. सगळ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करा म्हणत जरांगेचं आंदोलन स्क्रिप्टेड आहे हे समजेल। गरज पडल्यास माझे देखील चौकशी करा, असं संगीता वानखेडे यांनी म्हटलं आहे.