---Advertisement---

मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्याच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला ! नेमकं काय घडलं?

by team

---Advertisement---

Maratha Reservatio : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यासमोर सध्या अनके अडचणी उभ्या राहताना दिसत आहे, मग ते त्यांच्यावर विरोधकांच्या टीका असो किंवा त्यांच्याच निकटवर्तीयांनी त्यांच्यावर केलेले आरोप. अश्यातच त्यांच्यासमोर बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.गंगाधर काळकुटे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गाडीची तोडफोड केल्यावर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनातील सहकारी असलेले बीड येथील गंगाधर काळकुटे हे रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी गेले होते. जरांगे यांची भेट घेऊन परत येत असताना वडीगोद्री गावाजवळ एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी ते थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या काचा फोडल्या. गाडीवर हल्ला केल्यावर दोनही अज्ञातांनी तेथून पळ काढला. त्यामुळे घटनास्थळी काही काळ वातावरण तापले होते. मात्र, हा हल्ला कोणी आणि का केला याबाबत अजूनही कोणतेही माहिती समोर येऊ शकलेली नाही.

दरम्यान या सर्व घटनेनंतर गंगाधर काळकुटे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. “ मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेलं आंदोलन चिरडण्याचा हा डाव आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच, आंदोलन चिरडण्यासाठी कोणी कितीही प्रयत्न केले तरी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत आणि मराठा आरक्षणाची लढाई कायम सुरू ठेवणार असल्याचं म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---