मनोज जारांगेंचा अजय बारसकारांवर आरोप म्हणाले, माझ्यावर टीका करण्यासाठी…

जालना: “मनोज जरांगेंना दिलेला अध्यादेश हा १६ फेब्रुवारी किंवा त्यानंतर अंमलात येणार असल्याचे स्पष्ट लिहिले होते. तरीही गुलाल उधळण्यासाठी आझाद मैदानावर जायचं असे ते म्हणाले. त्यांना केवळ सरकारवर दबाव निर्माण करायचा होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी येऊन मला ग्लासभर पाणी पाजावं यासाठीच त्यांचा खरा अट्टाहास सुरु होता. जरांगेंची सुरु असलेली खटपट ही केवळ श्रेयवादासाठी आणि स्वत:ला मोठं म्हणवून घेण्यासाठी आहे,” असा आरोप, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते आणि किर्तनकार अजय महाराज बारसकर यांनी केला होता.

या आरोपानंतर जरांगे पाटलांनी एक दिवसांचे मौन बाळगणार होते.दरम्यान त्यांनी मौन सोडत आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, माझ्यावर आरोप करण्यासाठी अजय महाराज बारस्करांनी ४० लाख रुपये घेतले आहे. “अजय बारसकरांना हे बोलण्यासाठी ४० लाख रुपये मिळाले आहेत. म्हणूनच ते एका दिवसात एवढ्या गाड्या घेऊन मुंबईला गेलेत. त्यांना एकाच दिवसात एवढे चॅनेल्स कसे उपलब्ध होतात? मी १९ वर्ष संघर्ष करतोय तरीही मला एवढे चॅनेल उपलब्ध झाले नाहीत. यांना एका दिवसात झालेत. त्यामुळे मी राज्य सरकारला सांगू इच्छितो की, तुम्ही याला साथ दिली तर याच्यामुळे तुमच्या पक्षाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही,” असे ते म्हणाले.

“अजय महाराज बारस्कर यांचे आरोप हा ट्रॅप आहे. आतापर्यंत सहा महिने मी गोड होतो. हा सगळा मला बदनाम करण्याचा प्रयत्न असून यात मुख्यमंत्री शिंदेंचादेखील प्रवक्ता आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे समाजासोबत तुम्ही प्रामाणिक रहा. गद्दारीचा शिक्का मारून घेऊ नका,” असेही ते म्हणाले आहेत.