मराठवाडा : गुरूवारी सकाळी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. जमीन हादरू लागल्यामुळे अनेक नागरिक घाबरुन घराबाहेर आले. नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के हे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यात १९९३ नंतर आज (दि. २१) सकाळी भूकंपाचे सर्वात मोठे धक्के जाणवले.
हिंगोलीसह अनेक ठिकाणी गुरूवारी सकाळी-सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हिंगोलीमध्ये गुरूवारी सकाळी एकामागोमाग एक असे दोन भूकंपाचे धक्के बसले. १० मिनिटांच्या अंतराने झालेल्या या भूकंपामुळे नागरीक घाबरले. भूकंपाचा पहिला झटका 6 वाजून 8 मिनिटांनी जाणवला. 4.5 रिश्टर स्केल एवढी त्याची तीव्रता असून भूकंपाचा दुसरा झटका दहा मिनिटांनी 6 वाजून 19 मिनिटांच्या आसपास बसला. त्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती. हिंगोली व्यतिरिक्त नांदेड, परभणी येथेही काही ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.