मराठवाड्यातून भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अश्यातच अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी एक काँग्रेस नेत्या भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसमधले अनेक गटातटाच्या राजकारणात अशोक चव्हाण यांचा गट कायमच चाकूरकर गटाशी संलग्न होता. येत्या काळात काँग्रेसमध्ये फक्त देशमुख गटाचे वर्चस्व मराठवाड्यात असणार आहे. या सर्व बाबींच विचार करता अर्चना पाटील चाकूरकर यांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपची वाट धरल्याचे बोलल जात आहे.
मराठवाड्यात काँग्रेसला पुन्हा धक्का! माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची सून भाजपच्या वाटेवर?
by team
Published On: मार्च 28, 2024 6:49 pm

---Advertisement---