लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील आणि राजेश निटुरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. अर्चना पाटलांमुळे लातुरात नेतृत्व मिळालं असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली होती. काँग्रेसमधले अनेक गटातटाच्या राजकारणात अशोक चव्हाण यांचा गट कायमच चाकूरकर गटाशी संलग्न होता. येत्या काळात काँग्रेसमध्ये फक्त देशमुख गटाचे वर्चस्व मराठवाड्यात असणार आहे. या सर्व बाबींच विचार करता अर्चना पाटील चाकूरकर यांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपची वाट धरल्याचे बोलल जात आहे.