मराठा आंदोलनातील गुन्हे पडताळणीनुसार मागे घेण्यात येतील…काय म्हणाले मुख्यमंत्री ?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. “मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल आहेत ते पडताळणी नुसार मागे घेण्यात येत आहेत. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन, सभा, रॅली काढल्या म्हणून गुन्हे दाखल झाले आहेत. रस्ता रोकोवरुन गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांची पहिल्या टप्प्यात स्क्रुटीनाईज सुरु आहे. सरकार पूर्ण सकारात्मक आहे. जे नॉन सिरियस गुन्हे आहेत ते सरकारने काढण्याचा निर्णय आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच घेतलेला आहे. त्यामुळे त्याची छाननी सुरु आहेत, ज्यामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी नाही त्यांचं वर्गीरकरण केलं जाईल. जे गंभीर गुन्हे आहेत, ज्यात जीवितहानी, वित्तहानी आहे, मालमत्तेचं नुकसान झालं आहे, त्यांना दुसऱ्या क्रायटेरियात बसवून सकारात्मक मार्ग काढणार आहोत. छोटे गुन्हे काढण्याचा सरकार अगोदर घेतला आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.