हिंगोली : वसमत तालुक्यातील गणेशपूर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी दुपारी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. शिवराज काशीनाथ वाघमारे असे मृतकाचे नाव आहे. हिंगोली जिल्ह्यातील ही बारावी आत्महत्या आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गणेशपूर येथील शिवराज वाघमारे हे मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी होते. जिह्यात आतापर्यंत झालेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदविला होता. शासनाकडून मराठा आरक्षणाचा तसेच सगेसोयऱ्याचा निर्णय घेतला जात नसल्याने मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोलीत एकाची आत्महत्या
by team
Published On: फेब्रुवारी 19, 2024 10:48 am

---Advertisement---