नाशिक : साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी नाशकातील एका कार्यक्रमात ‘माझ्यामुळेच मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं नाही’ असं वक्तव्य केलं आहे. मी मराठा आरक्षणामध्ये घातलेला खुट्टा मनोज जरांगेंना उपटताच आला नाही, मी मराठ्यांना विरोध केल्यानेच ओबीसींनी मराठ्यांना एकमताने विरोध केल्याचंही ते म्हणाले.
रावसाहेब कसबे म्हणाले की, 2010 च्या दशकात ज्या वेळी ओबीसी आरक्षण पूर्ण धोक्यात आलं होतं, मराठे ओबीसी मध्ये जाणार होते.त्याबद्दल बहुमतहि झाले होते. छगन भुजबळांना हे सगळं माहीत आहे. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश होणार हे ठरलं होतं. त्यावेळी मी त्याला कडाडून विरोध केला. त्यानंतर एकमताने आम्ही मराठ्याना बाहेर काढलं. त्यानंतर जरागेची दुसरी मोहीम सुरू झाली. त्याच्या पहिल्याच भाषणात म्हणाला होता की, मराठा आरक्षणामध्ये रावसाहेब कसबेंनी घातलेला खुट्टा तो उपटणार. पण जरांगने काय केलं? 2010 सालीही माझ्यामुळेच मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळालं नाही. आता जरांगेंची दुसरी मोहीम सुरू झाली. या कार्यक्रमात राज्याचे मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.